पोलो
इराणमध्ये पहिल्या शतकात खेळला जाणारा, अत्यंत प्राचीन खेळ म्हणजे पोलो. काठी आणि चेंडू या साधनांनी घोड्यावरून खेळाण्याचा खेळ. आज याचे स्वरूप खेळ म्हणून असले तरी, प्राचीन काळी लोकजीवनातील एक धार्मिक सुफलता विधी म्हणून पोलोला मान्यता होती. त्याकाळी त्याचे आणखी एक रुप म्हणजे घोडेस्वारांच्या पलटणींना प्रशिक्षण देणारा क्रीडा प्रकार म्हणून पोलोची मदत घेतली जात व त्यात…
हॉकी
सर्वदूर पोहचलेल हॉकी खेळ भारताचा हा राष्ट्रीय खेळ. भारतीय हॉकी विश्वातील जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत हा खेळ अफाट गाजविला. हॉकी खेळाची सुरुवात साधारणपणे इसवी सन पूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये झाली असल्याचे पुरावे मिळतात. इतिहासाची पाने उलगडल्यास प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत असा उल्लेख आहे. हॉकीच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे हॉकी मैदानाची…
लंगडी
लंगडी हा महाराष्ट्रातील मुलामुलींचा आवडता खेळ आहे. कबड्डी, खो-खो खेळाप्रमाणे हा एक स्पर्श खेळ मानावा लागेल. लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. या खेळामध्ये लंगडी घालणाऱ्याने धावणाऱ्याला केलेला स्पर्श ठरवून संबंधित खेळाडूस बाद दिले जाते. लंगडी हा एक आदर्श खेळ आहे. लंगडी खेळातून काही मुलभूत कौशल्याचा विकास होतो व सहजप्रवृत्तीचे उदात्तीकरण होते. एका पायावर…
खेळांचे विश्व
मनोरंजनासाठी किंवा शारीरिक व्यायामासाठी खेळ खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळायला आवडते. काळानुसार खेळाच्या पद्धती बदलत असल्यातरी मानवाच्या अगदी प्राथमिक अवस्थेपासून खेळ खेळले जात असल्याचे पुरावे आहेत. प्राचीन वैदिक काल, रामायण, महाभारत याकाळांची माहिती घेतली तर द्युत, फासे, कुस्ती, घोड्यांच्या शर्यती आदी खेळांची वर्णने वाचायला मिळतात. केवळ भारतातच नव्हे तर…
कबड्डी
हमामा, हुंबरी, हुतुतू या नावानी ओळखला जाणार खेळ म्हणजे कबड्डी. पूर्वी हा खेळ नियमांचे कोणतेही बंधन न पाळता खेळला जात. महाराष्ट्रात पुण्याच्या ‘डेक्कन जिमखाना’ या संस्थेने १९१५-१९१६ साली सगळ्यात आधी या खेळाचे नियम तयार करून त्याच्यात सुसूत्रता आणली. १९३३ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने भारतीय खेळांचा प्रसार करावयाच्या धोरणानुसार या खेळात प्रथम नियमबद्धता आणि…
आहार-व्यायाम आरोग्याची गुरुकिल्ली
शरीर हे आरोग्यपूर्ण असावे, निरोगी असावे यासाठी हजारो वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. आपण ज्या सृष्टीत राहतो, त्या सृष्टीशी साम्य राखून आरोग्यप्राप्ती करणे सहज शक्य आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरात वाटर प्युरिफायर आलेले आहेत. किमान वॉटर फिल्टर तरी प्रत्येकाकडे असते. पूर्वीच्या काळी मात्र घरोघरी माठ असायचा आणि तो माठ ठेवण्यासाठी तिवई असायची. या तीन पाण्याच्या तिवईवर पूर्ण…