पोस्टातील बचत व गुंतवणूक

“थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे दरमहा दैनंदिन गरजांची पूर्तता करून शिल्लक राहिलेल्या अथवा बचत करून बाजूला ठेऊन दिलेल्या आपल्या पै पैशाची वृद्धी होणं देखील तितकेच अपेक्षित आणि आवश्यक असतं. अनेकदा आपल्याला यासाठी योग्य पर्याय सापडत नाही आणि बचतीचे पैसे एकतर आपल्याकडून खर्चतरी होतात अथवा तसेच पडून राहतात. यासाठी अगदी सोपा आणि सोईस्कर पर्याय म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या बचतीच्या पैशाची गुंतवणूक करणं. एकतर सरकारी व्यवस्थेत केलेली गुंतवणूक अधिक सुरक्षित असते आणि त्यामुळेच याद्वारे मिळणारा परतावा अर्थात मोबदला हमखास मिळतो.
भारतीय पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीच्या साधारणपणे सात ते आठ स्कीम्स आहेत. अनेकांच्या मनात या गुंतवणुकीच्या संदर्भात अनेक शंका असतात. यामधील सुरक्षिततेकडे डोळेझाक करावी म्हणून अनेकवेळा या गुंतवणुकीबद्दल गैरसमज निर्माण करून दिशाभूल केली जाते. वास्तविक अत्यंत खात्रीलायक आणि सुरक्षित अशी ही गुंतवणूक की जी मोबदला कदाचित थोडा कमी देत असेल तरीही इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या तुलनेने अधिक योग्य अशीच आहे.
नोकरी-व्यवसाय करणार्या प्रत्येकालाच काही प्रमाणात कर बचतीसाठी गुंतवणूक करावी लागते. अशावेळी भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते.
सद्य:स्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीचे उपलब्ध असलेले विविध पर्याय:
- पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाऊंट:
किमान गुंतवणूक: केवळ रोख रु. 20/- (वीस रुपये) भरून नवीन खाते उघडता येते. किमान सरासरी रु. 50/- चेकबुक नसल्यास तर ते असल्यास रु. 500/- शिल्लक खात्यात ठेवणे आवश्यक असते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा: या खात्यावरील गुंतवणुकीस कोणत्याही स्वरूपाची कमाल मर्यादा नाही.
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत या खात्यासाठी दरसाल 4.0% इतका व्याजदर आहे. कोणत्याही प्रकारातील या स्वरुपाच्या खात्यासाठी व्याजदर एकच आहे.
गुंतवणुकीचा कालावधी: कोणताही ठराविक कालावधी नाही हे खाते तहहयात चालू ठेवता येऊ शकते.
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: केवळ सज्ञान व्यक्तीस खात्यावरील व्यवहार करता येतो परंतु अज्ञान व्यक्तीच्या नावाने खाते जरूर उघडता येते मात्र त्यावरील व्यवहार अज्ञान व्यक्तीच्या पालनकर्त्यासच करावे लागतात.
खाते प्रकार: एकेरी अथवा दुहेरी बचत खाते उघडता येते.
खात्यावरील सोई सुविधा: चेकबुक सुबिधा उपलब्ध असल्यामुळे बँकेतील बचत खात्याप्रमाणेच हे खातं वापरता येतं. अर्थात काही रोख रक्कम भरण्याच्या तसेच काढण्याच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असते.
इतर संबंधित माहिती: या खातात तीन वर्षातून किमान एकदा पैसे भरण्याचे अथवा काढण्याचे व्यवहार होणे अनिवार्य असते. अन्यथा हे खाते कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केले जाऊ शकते.सदर खात्याला वारसाची नोंद खाते उघडताना अथवा नंतरही करता येऊ शकते.एका पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एकच खाते उघडता येते.
करमूल्यता: सन 2011-12 साठी गुंतवणुकीवरील मिळालेल्या एकेरी खात्यासाठी रु.3,500/- पर्यन्त करमाफी असून दुहेरी खात्यासाठी ती रु. 7.000/- आहे. तसेच सन 2012-13 साठी ती रु. 10,000/- पर्यन्त इतकी सरसकट सर्वांसाठी आहे.
- पाच वर्षे मुदतीचे पोस्ट ऑफिस रिकरींग अकाऊंट:
किमान गुंतवणूक: केवळ रोख अथवा चेकने रु. 10/- (दहा रुपये) भरून नवीन खाते उघडता येते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: कमाल मर्यादा नाही.
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत या खात्यासाठी दरसाल 8.3% इतका व्याजदर आहे. सदर व्याजाची रक्कम संबंधित खात्यात दर तीन महिन्याने जमा केली जाते.
गुंतवणुकीचा कालावधी: पाच वर्षे
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत अज्ञान व्यक्तिला खात्यावरील व्यवहार करता येत नाहीत. त्यापुढील वयातील अज्ञानव्यक्ती देखील ते करू शकते.
खाते प्रकार: एकेरी अथवा दुहेरी
खात्यावरील सोई सुविधा: एका पोस्ट ऑफिसमधील खाते दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जाण्याची सुविधा या खात्यावर उपलब्ध असते.
इतर संबंधित माहिती: एका पोस्ट ऑफिसमध्ये एकाच वेळी कितीही खाती उघडता येतात.
- पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाऊंट:
किमान गुंतवणूक: केवळ रोख अथवा चेकने रु. 200/- (दोनशे रुपये) भरून नवीन खाते उघडता येते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: कमाल मर्यादा नाही.
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत खाते उघडल्यापासून दोन वर्षापर्यंतचा व्याजदर दरसाल 8.20%, दोन ते तीन वर्षे 8.30% आणि तीन ते पाच वर्षे 8.40% असा आहे.
गुंतवणुकीचा कालावधी: दोन, तीन आणि पाच वर्षे
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत अज्ञान व्यक्तिला खात्यावरील व्यवहार करता येत नाहीत. त्यापुढील वयातील अज्ञानव्यक्ती देखील ते करू शकते.
खाते प्रकार: एकेरी अथवा दुहेरी
खात्यावरील सोई सुविधा: एका पोस्ट ऑफिसमधील खाते दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जाण्याची सुविधा या खात्यावर उपलब्ध असते.
इतर संबंधित माहिती: एका पोस्ट ऑफिसमध्ये एकाच वेळी कितीही खाती उघडता येतात.
करमूल्यता: केवळ पाच वर्षे मुदतीच्या खात्यासाठी गुंतवणुकीच्या व्याजवरील कर बचतीचा पर्याय उपलब्ध आहे.
- पोस्ट ऑफिस मंथली इन्कम अकाऊंट स्कीम:
किमान गुंतवणूक: रु. 1,500/- भरून खाते उघडता येते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: रु 4,50,000/- एकेरी खात्यासाठी तर रु. 9,00,000/- दुहेरी खात्यासाठी
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत या खात्यासाठी दरसाल 8.40% इतका व्याजदर आहे. सदर व्याजाची रक्कम संबंधित खात्यात दर महिन्याल जमा केली जाते. ती रक्कम दरमहा या खात्यामधून काढण्याची सुविधा असते.
गुंतवणुकीचा कालावधी: पाच वर्षे
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत अज्ञान व्यक्तिला खात्यावरील व्यवहार करता येत नाहीत. त्यापुढील वयातील अज्ञानव्यक्ती देखील ते करू शकते.
खाते प्रकार: एकेरी अथवा दुहेरी
खात्यावरील सोई सुविधा: एका पोस्ट ऑफिसमधील खाते दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जाण्याची सुविधा या खात्यावर उपलब्ध असते.
इतर संबंधित माहिती: एका पोस्ट ऑफिसमध्ये एकाच वेळी कितीही खाती उघडता येतात.
- सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम:
किमान गुंतवणूक: रु. 1,000/- भरून खाते उघडता येते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: रु. 15,00,000/-
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत या खात्यासाठी दरसाल 9.20% इतका व्याजदर आहे.
गुंतवणुकीचा कालावधी: पाच वर्षे
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ति. तसेच वयाची साठी पूर्ण न केलेली परंतु 55 वर्षे वयापेक्षा जास्त वय असणारी आणि सेवा निवृत्ती घेतलेली व्यक्ति.
खाते प्रकार: एकेरी अथवा दुहेरी (केवळ पती-पत्नी)
खात्यावरील सोई सुविधा: केवळ व्याजाची रक्कम खात्यातून काढून घेण्याची सुविधा उपलब्ध असते.
इतर संबंधित माहिती: एका पोस्ट ऑफिसमध्ये एकाच वेळी कितीही खाती उघडता येतात. परंतु एकूण रक्कम कमाल मर्यादेच्या आत असणे आवश्यक
करमूल्यता: गुंतवणुकीच्या व्याजवरील कर बचतीचा पर्याय उपलब्ध आहे.
- पंधरा वर्षे मुदतीचे पब्लिक प्रोविडेंट फंड अकाऊंट:
किमान गुंतवणूक: रु. 500/- भरून खाते उघडता येते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: एका आर्थिक वर्षात रु. 1,00,000/-
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: सद्य:स्थितीत या खात्यासाठी दरसाल 8.70% इतका व्याजदर आहे.
गुंतवणुकीचा कालावधी: 15 वर्षे. नंतरही पाच वर्षे मुदत वाढवता येते.
गुंतवणुकीसाठी वयाची पात्रता: वयाची अट नाही.
खाते प्रकार: एकेरी. दुहेरी खाते उघडता येत नाही.
खात्यावरील सोई सुविधा: या खात्यावरील तिसर्या वर्षी जमा रकमेनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या खात्याला कोणत्याही प्रकारचे कोर्टाच्या ताब्याचे बंधन नसते. अत्यंत सुरक्षित मानले जाणारे हे खाते असून कोणत्याही परिस्थितीत हे खाते अबाधित राहते.
इतर संबंधित माहिती: सदर खात्याला वारसाची नोंद खाते उघडताना अथवा नंतरही करता येऊ शकते. पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एकच खाते उघडता येते.
करमूल्यता: या खात्यावरील व्याज तसेच गुंतवणूक दोन्हीही ठराविक मर्यादेपर्यंत करमुक्त आहे.
- पाच व दहा वर्षे मुदतीचे नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट:
किमान गुंतवणूक: रु. 100/- भरून खाते उघडता येते. रु. 100/- रु. 500/-, रु. 1,000/- रु. 5,000/- आणि रु. 10,000/- अशा स्वरुपात ही गुंतवणूक करता येऊ शकते.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा: कमाल मर्यादा नाही.
व्याजचा दर/मुदतीअंती मिळणारा परतावा: पाच वर्षे मुदतीसाठी दरसाल 8.30% तर दहा वर्षे मुदतीसाठी दरसाल 8.80% असा सद्य:स्थितीत व्याजदर आहे.
गुंतवणुकीचा कालावधी: पाच व दहा वर्षे
खाते प्रकार: एकेरी सज्ञान व्यक्ति अज्ञान व्यक्तीच्या नावाने असे खाते उघडू शकते.
करमूल्यता: या खात्यावरील व्याज तसेच गुंतवणूक दोन्हीही ठराविक मर्यादेपर्यंत करमुक्त आहे.
या व्यतिरिक्त अधिक माहिती भारतीय पोस्ट ऑफिसच्या http://www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारतीय पोस्ट ऑफिस मधील आपली गुंतवणूक ही निश्चितच आपल्या राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त आणि आपल्यासाठी अधिक सुरक्षित ठरेल यात शंकाच नाही.