स्वयंपाक घरातील अंतर्गत बागबगीचा

आपण कितीही ठरवले तरीही निसर्गापासून फार दूर जाऊ शकत नाही. निर्सगाच्या सानिध्यात आपल्या अंतर्मनाला मिळणारा अत्यानंद आपण कितीही प्रयत्न केला तरीही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा आपल्या हातून निसर्गाशी आपलं असलेलं नातं सिद्ध करण्यासाठी कृती घडून येते. अशावेळी आपल्या घरात आपल्याला निसर्गनिर्मित वृक्षवल्ली हव्या हव्याशा वाटू लागतात. घरातली एखादी खोली अथवा एखादा कोपरा एखाद्या छोटेखानी बागेत रुपांतरीत होतो, कुंडीमध्ये रोवली जाते ती छोटीशी वेली देखील हळूहळू वृक्षाचे रूप धरण करू लागते.    

स्वयंपाक घरातील अंतर्गत बाग  म्हणजे काय तर घरातल्या घरात भाजी पिकवणे. अंतर्गत बाग  कोणाला नको असते पण सर्वांनाच ते शक्य असत अस नाही. स्वयंपाक करत असताना जर  घरातील ताज्या भाज्यांचा समावेश करता आला तर सगळ्यांनाच ते आवडणार असेल. यासाठी घराबाहेर किवा घराच्या आजूबाजूला खूप जागा असावी अस काही गरजेच नाहीय. परसबागे इतक्याच  भाज्या आपण स्वयंपाक घरातील खिडकीत किंवा घरातील छोट्या जागेत मध्ये लावू शकतो.

आजकाल घर सजवताना  आपल्या घरात झाडे असावी यावर भर दिला जातो पण शोभेच्या झाडासोबतच  कडीपत्ता, लिंबू, मिरची  आल, कोथींबीर, पुदिना असे विविध प्रकारचे झाडे लावल्यास त्याचा उपयोग स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात करता येईल. आपल्याच  घरातील कुंड्यांमधील भाज्या तोडून त्यांचा जेवणात समावेश झाल्यास त्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहील. घर सजवताना घरातील खिडक्या, गॅलरी, काही कोपरे हे झाडांनी सजवण्यावर भर दिला जातो. अशा वेळी घरात कोणत्या प्रकारचे झाडे असावे ते दिसायला आकर्षक तर असतीलच पण त्याच बरोबर उपयुक्त देखील असावे याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

घरातील बगीच्यात झाडे लावण्यासाठी मोठ्या जागेची गरज नसते. तुमच्या घरातील खिडकीच्या कट्ट्यावर, ग्रील मध्ये, बाल्कनीतल्या छोट्या जागेत, कुठेही तुम्ही हा बगीचा फुलवू शकता. या बगीच्यात भाज्यांसोबातच फळ, फुल, औषधी झाडे देखील लावू शकता. ताज्या भाज्या तर मिळताच पण त्याच सोबत निसर्गच घरी दाखल झाल्याचा अनुभव येतो. या प्रकारच्या गार्डेन मधील झाडांना मुबलक सूर्यप्रकाश, दोन वेळेस पाणी आणि सेंद्रिय खत महिन्यातून एकदा टाकणे इतकीच काय ती देखभालीची गरज असते. या प्रकारच्या छोट्या परसबागेमुळे घराला नॅचरल आणि ग्रीन लुक येतो. शहरात राहून देखील निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्याचा अनुभव परसबागेमुळे नक्कीच येईल.

अंतर्गत बाग म्हणजे काय ? हे आपण पाहिलं आता घराभोवती अंतर्गत बाग कशी लावता येईल ? हे आपण आता बघू.  शहरापासून लांब असलेल्या किंवा गावामध्ये अंतर्गत बाग दिसून येते. शहरातील घरे मुळातच आकाराने लहान असल्यामुळे बाल्कनी मध्येच आनंद मानावा लागतो. पण गावाकडे किंवा शहरापासून थोड लांब असणाऱ्यांना मात्र परसबागेचा आनंद घेता येतो. घराभोवती अंतर्गत बाग  असल्यामुळे वातावरण प्रसन्न व हवा शुद्ध राखण्यास मदत होते. त्याच बरोबर घरासाठी लागणाऱ्या भाज्या फळ, फुल याच परसबागेत  होऊ शकतात. परसबागेसाठी शेती प्रमाणे खत आणून टाकावे लागत नाही. स्वयंपाक घरातील निवडलेल्या भाज्यांचा कचरा, अन्न, सांडपाणी इत्यादीपासून खत तयार करून ते परसबागेसाठी वापरले जाते.

 घरातील सांडपाण्याचा यौग्य वापर करून त्यावर अंतर्गत बाग  फुलवली जाऊ शकते. अंतर्गत बाग  तयार करण्यासाठी विशेष काही कराव लागत नाही.  फक्त भाजीपाला न लावता त्यासोबत विविध प्रकारचे फुलझाडे लावावी. फुलांसोबत काही शोभेची झाडे देखील लावावी जेणेकरून परसबागेमध्ये हिरवळ दिसेल. फुलांचा सुगंध सर्वत्र पसरल्याने घराभोवती वातावरण प्रसन्न होईल. अंतर्गत बागेचे महत्त्व जास्त यासाठी आहे की सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. या पाण्यामधून भाजीपाला, फळ, फुले  यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. सांडपाणी परसबागेसाठी वापरल्यामुळे पाण्याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे स्वच्छता राहते, सांडपाण्याचा निचरा होतो आणि आरोग्याचा धोका निर्माण होत नाही. घरातच ताजा भाजीपाला होत असल्याने बाहेरून भाजी विकत आणावी लागत नाही.

अंतर्गत बागेत पाण्याचा वापर

दररोजच्या धावपळीत थकवा दूर करण्यासाठी बदल हवा असतो आशा वेळी शहरापासून लांब डोंगर नदीच्या सहवासात राहावे आणि यामध्ये जर पाणी, धबधबा  दिसला तर मग थकवा कुठल्याकुठे पळून जात्तो. पण प्रत्येक वेळी अशा ठिकाणी जाणे प्रत्येकच वेळी जाणे शक्य नसते पण धबधबाच तुमच्या जवळ आला तर हो तुम्ही तुमच्या घरात,खोलीत,ऑफिस मध्ये छोट्या जागेत कुठेही  कृत्रिम धबधबा लावू शकता.

या धबधब्यात विविध रंगाचे पाने फुले, पक्षी, डोंगर या सगळ्यांमधून पाण्याचा होणारा खळखळाट वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणतो. वास्तूशास्त्रा प्रमाणे घरात वाहते पाणी किवा तसे चित्र कलाकृती असल्यास त्या  वास्तूमध्ये नेहमीच आनद, उत्साहवर्धक वातावरण राहत. घरात धबधबा आणल्यास सुख, शांती नादते. तुम्ही अगदी सहजपणे कृत्रिम धबधबा घरच्या घरी देखील बनवू शकता. त्यासाठी तुम्ही आधी तो किती उंचीवर ठेवणार, कुठे ठेवणार, कोणत्या खोलीत ठेवणार कि घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवणार याचा विचार करावा.

धबधबे हे चिनीमाती, गारगोटे, दगड इत्यादींपासून तयार केले जातात. हे विविध आकारात बनवले जातात.  या धबधब्यामधील पाण्याचा आवाज हा सर्वात महत्वाचा घटक आहे. या धबधब्याची खरी मजा ही त्याच्या आवाजातच आहे. या  ध्वनी मुळेच प्रसन्न वाटत.  तो सतत येण्यासाठी आणि त्याचा प्रवाह सुरु ठेवण्यासाठी त्यात एक छोटी विद्युत मोटार बसवली जाते. मोटारीच्या आकाराप्रमाणे धाब्ध्यातील पाण्याचा आवाज व प्रवाह ठरतो. धबधबा ठेवताना तो अशा ठिकाणी ठेवावा कि त्या जागेकडे पटकन लक्ष वेधल जाईल. धबधबा सजवताना त्यामध्ये थोडी हिरवळ दाखवण्यासाठी छोटी रोप, फुल लावावी. त्याचप्रमाणे धबधब्यामध्ये लाईट बसवल्यास रात्रीच्या वेळी तो प्रकाशामुळे सौंदर्यात अधिकच भर पडेल. यांची निगा राखणे अगदी सहज असते  यासाठी काही विशेष अशी काळजी नाही घ्यावी लागत. पाणी कमी झाल्यास टाकत राहावे वा खराब झाल्यास बदलावे. शांत, निर्मळ असा आवाज सतत होईल. सजावटीचा धबधबा घेतल्यावर त्याची सुंदरता टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जर आपण आपल्या घरात किवा ऑफिस मध्ये धबधबा ठेवल्यास कामाचा ताण काही प्रमाणात नक्कीच कमी होऊन वातावरण सकारात्मक बदल झाल्याचे जाणवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा